पिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार

0
1626

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – जुण्या भांडणाच्या रागातून दोघा जणांनी मिळून एका तरुणाच्या घरात घुसत त्याच्या डोक्यात चाकूने वार केले. ही घटना पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या सेनेटरी चाळीमध्ये घडली.

विकी सतीश ठोकळ (वय २२, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ, पिंपरी) असे चाकूने वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश काशिनाथ काळे (वय २५) आणि कृष्णा काशिनाथ काळे (वय २०, दोघे रा. काळेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकी ठोकळ हे त्यांच्या पत्नीसोबत पिंपरीतील सेनेटरी चाळीतील भाड्याच्या खोलीत राहतात. जुण्या भांडणाच्या रागातून आरोपी अविनाश आणि कृष्णा हे दोघे त्यांच्या घरात घुसले. तसेच त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्या चाकूने वार करुन पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.