परीवर्तनवादी युवा संघटना पिंपरी चिंचवडच्या वतीने मार्गदर्शन शिबिर व इफ्तारचे आयोजन

0
392

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – परीवर्तनवादी युवा संघटना पिंपरी चिंचवडच्या वतीने रमजान या पवित्र महिन्याचे औचीत्य साधून हिंदू मुस्लिम बहुजन युवकांना एकत्रित आणून ‘दावत ए एकता युवा मिलाप’ या मार्गदर्शन शिबिर व इफ्तार या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख व्याख्याते म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे, तसेच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे माननीय उपस्थीत होते.

महाराष्ट्रभर मशिदी वरील भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण होईल अश्या परिस्थितीच्या पार्श्भूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. “हिरव्या भगव्या च्या नादी लागून मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालीसा या राजकारणात तरुणांनी पडू नये काही लोकांनी कोणाची तरी सुपारी घेऊन हा भुंगा वाजवण्याचा निर्धार केला असून जर दोन्ही समाजातील युवकांनी प्रतिसाद दिला नाही तर ते काहीही करू शकणार नाहीत आज कालच्या दिवसात एकाने भोंग्या ची भाषा करायची आणि एक आणि दगड मारायची अशी स्थिती तयार केली गेली आहे.

हिंदू-मुस्लीम दंगलीचे परिणाम आम्ही 1993 ला भोगले आहेत त्यामुळे आता या घटनांची पुनरावृत्ती नको” असा सल्ला तरुणांना मार्गदर्शन करताना प्रवीण दादा गायकवाड यांनी दिला. विकसित असलेल्या देशात दंगली होत नाही दंगली फक्त भारतात होतात विकसित देशात धर्माच्या आधारे टोकाचे वाद होत नाहीत ते फक्त भारतात होतात मग आपण कोणाकडून काय शिकतोय हे तरुणांनी एकदा तपासले पाहिजे आणि दंगली करून आपल्या कुटुंबाला आपण का रस्त्यावर आणतोय याचा विचार केला पाहिजे इथून पुढचा काळ हा आणिबाणीचा आहे त्यामुळे तरुणांनी गाफील राहू नये

आज भारतात बेरोजगारी महागाई शिक्षण पेट्रोल गॅस डिझेल हे दरवाढ होत असताना यासारख्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी कुणीतरी मुद्दाम जातीय खुरापतींना खतपाणी घालत आहे दोन्ही समाजातील युवकांचे माथे भडकवण्याचे काम जाणून बुजून केले जात आहेत मागच्या वेळेस परप्रांतीय यांना विरोध करा तसेच टोल नाक्याच्या विरोध करा असे सांगून तरुणांची माथी भडकवली गेली आणि युवकांना उत्तेजीत करून त्यांना सार्वजनिक संपत्तीची नुकसान करण्यास भाग पाडलं गेलं त्यावेळी महाराष्ट्रभर शिक्षण घेत असलेले, नोकरी करत असलेले,असंघटित तरुण कायदेशीर गुन्ह्यात अडकले गेले आणि त्यांचे कुटुंब व ते स्वतः अडचणीत आले व त्यांचं करियर उध्वस्त झालं. आणि तरुणांना हे करायला भाग पाडलं त्या नेत्याने एकाही तरुणाला कायदेशीर कारवाईतून सोडवलं नाही याची आठवण ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी तरुणांना करून दिली.

देशावर सद्यस्थितीत कोणाचीही प्रेम राहिले नसून नकली राष्ट्रवाद उफाळून आणला जात आहे मिस कॉल देऊन पक्षाचे मेंबर होतात अशा देशात आपण राहतो. खरंतर राज ठाकरे यांनी भोंग्यांचा वाद निर्माण केला ही पद्धत चुकली असून त्याला आपण सर्व नागरिक जबाबदार आहोत कारण कोणतीही शहानिशा न करता अशा गोष्टींना महत्व दिल्यामुळे नेत्यांची खोटं बोलण्याची हिम्मत वाढत आहे. मशिदीवरील भोंगे काढा असा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नाही, तर विनापरवानगी असलेले बेकायदेशीर भोंगे काढा असे म्हंटले आहे आणि राज ठाकरे यांनी जसं सांगितलं तसा असल्यास तुम्ही तो निर्णय आम्हाला दाखवावा असे आव्हान राज ठाकरे यांना केलं आहे. धार्मिक सण उत्सव किंवा जयंती यासारखे कार्यक्रम समाजाला एकत्रित आणण्यासाठी केले गेले पाहिजेत यातून प्रबोधन झालं पाहिजे ध्वनि प्रदूषण होता कामा नये याचं भान सर्व धर्मियांनी ठेवावं असे आव्हान प्रसिद्ध वकील एडवोकेट असीम सरोदे यांनी यावेळी केलं.

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर सगळीकडे पारंपारिक इफ्तार पार्टी केली जात असताना एक वेगळ्या धाटणीचा वैचारिक चळवळ असलेला अतिशय चांगला असा कार्यक्रम परिवर्तनवादी युवा संघटना च्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रानभाई शेख, विशाल काळभोर, प्रसन्न डांगे,आयुष निंबारकर,राहुल पवार व त्यांची टीम यांनी केला असून या सारखे वैचारिक बैठक असलेले कार्यक्रम शहरात सतत झाले पाहिजे अशी अपेक्षा मी आयोजकांकडून करतो असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हणे यांनी मांडलं.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफ कुरेशी शिवसेनेचे युवा नेते मुनाफ तरासगार युवा नेते बाबू शेट्टी माजी अध्यक्ष विशाल वाकडकर, कामगार नेते युवराज पवार, सचिन काळे दीपक साकोरे व पिंपरी चिंचवडमधील सर्व प्रमुख पक्षाचे नेते व सामजिक संघटना यांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले व सर्व बहुजन युवकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली व सर्वांनी मिळून एकतेची शपथ घेत एकमेकांना घास भरवत रोजा इफ्तार केल्याचं अनोखे चित्र यावेळी पाहायला मिळालं.