‘स्पर्धा परीक्षार्थींना’ मोठा फटका ; आता ‘आणखी’ एक संधी मिळणार नाही; न्यायालयाने फेटाळली याचिका

0
171

नवी दिल्ली, दि.२४ (पीसीबी) : २०२० साली कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातलं. त्यामुळे भारतातही कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांना तोटा सहन करावा लागत होता. तसाच तोटा देशातल्या विद्यार्थी वर्गाचाही झाला आहे. आता त्यातच एमपीएसी-युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि बुडालेली संधी यांची चिंता लागली होती. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने अखेर महत्त्वाचा निकाल दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांची २०२० मधली UPSC परीक्षा देण्याची संधी गेली, त्यांना ती पुन्हा देता येणार नाही, असा निकाल थेट सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षाही उशिरा म्हणजेच ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आल्या या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. करोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना २०२१ची UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करता आली नाही, त्यांना ठरलेल्या संधींपेक्षा एक अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत ही याचिका सरळ फेटाळून लावली.