पनवेल जवळील अपघातात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे जखमी

0
756

नवी मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  एकवीरा देवीच्या दर्शनावरुन परतत  जाताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला पनवेलजवळ अपघात झाला.  या  अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.  तर राज ठाकरे दुसऱ्या गाडीत होते.  अपघातावेळी त्यांची गाडी पुढे निघून गेली होती.

राज ठाकरे आज (शनिवार))  सकाळी सहकुटुंब कुलदैवत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते.  दर्शनावरुन परत येत असताना दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक एक रिक्षा गाडीसमोर आली. त्यामुळे शर्मिला यांच्या गाडीच्या वाहनचालकाने तातडीने ब्रेक मारला. त्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि ती पुढच्या गाडीला धडकली. तर मागूनही दुसऱ्या गाडीने धडक दिली. यामध्ये तिघांना किरकोळ दुखापत झाली.