…म्हणून खडसे, तावडे, बावनकुळे यांना उमेदवारी नाही; गिरीश महाजनांचा खुलासा  

0
658

नाशिक, दि. ५ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाशिकचे बाळासाहेब सानप मागे होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही,  असा खुलासा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

नाशिक मध्ये भाजपच्या उमेदवारांनी केलेली  बंडखोरी रोखण्यासाठी  महाजन नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपमध्ये सर्वेक्षणातून उमेदवारी दिली जाते. पैसे देऊन नाही, असा टोला विरोधकांना  लगावला.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुलीला उमेदवारी दिल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. राज्यात बंडखोरी झाली असली,  तरी अर्ज माघारीपर्यंत सर्व ठीक होईल,  असे महाजन यांनी सांगितले. तसेच बंडखोरांना माफी नाही. पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी बंडखोरांना दिला आहे.