पटत नसेल, तर निघा; सुशीलकुमार मोदींनी शत्रुघ्न सिन्हांना सुनावले

0
1161

पाटणा, दि. १७ (पीसीबी) – तुम्हाला पक्षाची भूमिका आणि धोरण पटत नसेल, तर निघा असे भाजपा नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना सुशील मोदी यांनी सिन्हा यांना ताकीदच दिली आहे. 

शत्रुघ्न सिन्हा हे सतत भाजप विरोधात  टीका करताना दिसत आहेत. तसेच १९ जानेवारीला होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीतही आपण हजर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मागील महिन्यात काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही, असे म्हटले होते.

तर भाजपवर हल्ला चढवणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडणार नाही, असे  म्हटले  आहे.  त्याचमुळे सुशील मोदींनी त्यांना सुनावले आहे. पटत नसेल तर निघा अशा शब्दात सुशील मोदींनी शत्रुघ्न सिन्हा यांना इशाराच दिला आहे.