लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते आजारी; पंतप्रधान मोदी चिंतेत

0
897

नवी दिल्ली , दि. १७ (पीसीबी) – आगामी  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांची प्रकृती बिघडू लागल्याने पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मोठा पेचनिर्माण झाला आहे. तर निवडणुकीआधी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प  १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना अर्थमंत्री अरूण जेटली कर्करोगावार उपचार घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे  महत्त्वाचे अनेक नेते आजारी असल्याने मोदी सरकारची चिंतेत भर पडली आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्लूमुळे अमित शाह पुढील दोन-तीन दिवस ते हॉस्पिटलमध्येच राहण्याची शक्यता आहे.

अरुण जेटली कॅन्सरावरील  उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहे. त्याआधी १४  मे २०१८ रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली.

श्वसननलिकेत त्रास होत असल्याने केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनाही सोमवारी एम्समध्ये दाखल केले होते. त्यांना आयसीयूमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आगामी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये प्रकृती बिघडल्याने सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव रामलाल यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना नोएडामधील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना कॅन्सरने ग्रासले आहे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर२०१८ च्या सुरुवातीला त्यांच्या तीन महिने उपचार सुरु होते. यानंतर एम्समध्येही त्यांच्यावर उपचार करण्यात आले.