पक्षावर नाराज आहात का? या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी दिलं सूचक उत्तर!

0
673

मुंंबई,दि.११(पीसीबी) – गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतून परळीकडे जात असताना पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी, पक्षावर नाराज आहात का?, असा प्रश्न विचारला असता त्यावर पंकजा मुंडे यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे.

इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा, असं सूचक उत्तर देत पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतली. गोपीनाथ गडावरील कार्यक्रम हा वेगळा आहे. त्याला कोणताही राजकीय रंग नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

गोपीनाथगडावर जय्यत तयारी सुरु असून मी एक दिवस आधी रवाना होत आहे. जे काय बोलायचं आहे ते उद्या बोलेन, असंही पंकजांनी स्पष्ट केलं.