पंतप्रधानांची जात मला माहीत नाही – प्रियंका गांधी

0
484

अमेठी, दि. २८ (पीसीबी) –  पंतप्रधानांची जात कोणती हे मला आजतगायत माहीत नाही. मला वाटते विरोधी पक्षाने असले राजकारण कधीच केलेले नाही, अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी  पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.   

विरोधी पक्ष, त्यातही काँग्रेसचे नेते नेहमीच प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर बोलत आले आहेत. आम्ही कधीच कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही, असेही प्रियांका यांनी स्पष्ट केले.

जनतेचा आदर करणे, त्यांच्या समस्या सोडवणे हाच सर्वात मोठा राष्ट्रवाद आहे. पण काही लोक जनतेचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. याला लोकशाही म्हणता येणार नाही आणि हा राष्ट्रवाद तर मूळीच नाही, असेही प्रियांका यांनी  मोदींना सुनावले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील कनौज येथील सभेत मोदी यांनी  माझी जात इतकी लहान आहे की, गावात आमचे एखाद-दुसरे घरही सापडत नाही. मी मागास जातीत नाही तर अतिमागास जातीत जन्मलो आहे. हे बोलण्यास मला तुम्हीच भाग पाडत आहात’, असे मोदी म्हणाले होते.  यावर  प्रियांका गांधी यांनी मोदीवर निशाणा साधला आहे.