नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ अभिनव उपक्रम

0
451

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत नवीन मतदारांची संख्या  लक्षणीय वाढली आहे.    नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग त्यांच्यासाठी अनोखा ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतला आहे. 

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आणि नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी माय फर्स्ट व्होट सेल्फी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.  सोमवार (दि.२९) सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल.

युवा मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केद्रांच्या १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. तो सेल्फी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या [email protected] या ई-मेल अथवा ९३७२८३००७१/ ९३७२८३००७१ या व्हॉट्सअॅपवर पाठवावा.