पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी नीरव मोदीला फरार घोषित केलेचं !

0
307

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयाने आज हा निर्णय दिला.

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती, असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.

अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय बँकेला गंडा घालून २०१७ साली डिसेंबर महिन्यात देशाबाहेर फरार झाले. त्याने केलेल्या ११,४०० कोटींच्या या घोटाळ्याचे मूळ हे पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतून दिली गेलेली तब्बल १५० ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)’ अर्थात ‘चैन पत्रा’तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.