RBI ने केले पतधोरण जाहीर, रेपो दारात घट नाही तर महागाई दर ५.१ टक्के राहणार

0
290

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात रेपो दर घटवलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे बँकेचा रेपो दर ५.१५ टक्के स्थिर राहणार आहे. सध्या देशावर आर्थिक मंदीचे सावट असल्याने RBI या पतधोरणात रेपो दर कमी करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

पतधोरण समितीतील सर्वच्या सर्व सहा सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याला कौल दिला. बँकेने विकासदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज ५ टक्के कमी करण्यात आला. त्याशिवाय ऑक्टोबर ते मार्च या कालावधीसाठी महागाई दर ५.१ टक्के राहील, असा नवा अंदाज बँकेने वर्तवला आहे.

दरम्यान याआधी RBI ने सलग पाचवेळा रेपो दरात कपात केली होती. मात्र बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही. पतधोरणातील व्याजदर स्थिर राहिल्याने गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना आरबीआयने यापुढे व्याजदर कपातीस संधी असल्याचे संकेत दिले आहेत.