‘सत्ता गेली म्हणून अवधूत वाघांचे डोके फिरले आंदोलनकर्त्यांची तुलना थेट दहशवाद्यांशी

0
456

महाराष्ट्र, दि.५ (पीसीबी) –  मराठा आरक्षण आंदोलन,नाणार प्रकल्प आंदोलन, भीमा कोरेगाव याची तुलना कसाब बरोबर करत असाल तर भाजप नेते अवधूत वाघ यांना फाशी दिली तरी चालेल, अशी स्पष्ट भूमिका मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मांडली आहे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येताचं विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे. यावरून अवधूत वाघ यांनी सरकारला लक्ष्य करत घणाघाती टीका केली होती.

नशीब… कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते, असे ट्विट वाघ यांनी केले आहे. हाच धागा पकडत रुपाली ठोंबरे यांनी अवधूत वाघ यांचा समाचार घेतला आहे. ? मराठा आरक्षण आंदोलन,नाणार प्रकल्प आंदोलन, भीमा कोरेगाव याची तुलना कसाब बरोबर करत असाल तर अवधूत वाघ यांना फाशी दिली तरी चालेल असे रुपाली ठोंबरे यांनी आपली पोस्टमध्ये लिहिले आहे.

याला म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी,जर आंदोलांकर्ता आणि अतिरेकी, दहशतवाद यातला फरक न कळण्याइतका अवधूत वाघ शिकले…

Gepostet von Rupali Patil Thombare am Mittwoch, 4. Dezember 2019