कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे मोठे षडयंत्र – उच्च न्यायालय

0
1644

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद हे मोठे षडयंत्र होते, असे मत आज (सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडेच्या याचिकेवर आज  सुनावणी झाली. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

आरोपी तेलतुंबडे याने आपल्याला फसवले जात असल्याचा दावा करत आपल्याविरोधात दाखल एफआयआर रद्द करण्याच्या मागणी मुंबई उच्च न्यायालयाने केली होती. यावर न्यायमूर्ती बी.पी.धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस.वी.कोतवाल यांच्या खंडपीठाने तेलतुंबडेविरोधात खटला चालविण्यायोग्य सामग्री उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद हे मोठे षडयंत्र होते, असे नमुद केले.