निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्षच राहतील – राधाकृष्ण विखे-पाटील

0
446

अहमदनगर, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपवासी झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड  झाला आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्षच राहतील, अशी टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेसने आपल्या धोरणापासून  दूर जात आहे.  त्यामुळे काँग्रेसमधून चांगले नेते बाहेर पडत आहेत. आता काँग्रेसला कोणतीच दिशा राहिलेली नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्षच राहतील, असे विखे -पाटील यांनी  म्हटले आहे.

देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला तीन महिने अध्यक्षच नव्हता. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी पडझड झाली  आहे, असे ते म्हणाले.

युती सरकारने ४० लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मराठा आरक्षण दिले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या २२ सवलती लागू केल्या.  हे सर्व धाडसी निर्णय या सरकारने राज्यात तसेच केंद्रात घेतले आहेत, असे सांगून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने त्यावेळी हे निर्णय का घेतले नाही?  शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याचे कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत, असेही विखे पाटील म्हणाले.