नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला..

0
306

सिंधुदुर्ग, दि. ३० (पीसीबी) : भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

 

 

 

 

मंगळवार दुपारपासून नितेश राणेंच्या जामीनअर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरु होता. मंगळवारी कोर्टाची वेळ संपल्यामुळे बुधवारी पुन्हा या युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली होती. अखेर आज गुरुवारी नितेश राणेंच्या जामीनअर्जावर नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहिले होते.. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील या दोघांचाही युक्तिवाद आता पूर्ण झाला आणि सायंकाळी नितेश राणेंना जामीन फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. पोलिसांना नितेश राणे यांची चौकशी करायची आहे. मात्र नितेश राणे नेमके कुठे आहे, याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. तर दुसरीकडे मंगळवारी कोर्टानं नितेश राणेंना अंतरीम जामीन देण्याची वकील संग्राम देसाई यांची मागणी फेटाळली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे हे नेमके कुठे आहे, याचंही गूढ कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांंनी नोटीस पाठवली होती. ही नोटीस नारायण राणेंच्या घरावर चिकटवण्यात आली होती. ही नोटीस दहा मिनिटांतच काढूनही टाकण्यात आली. दरम्यान, आता नारायण राणेंनीही या नोटीसीला प्रत्युत्तर दिलंय.