कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजप नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल….

0
328

पिंपरी चिंचवड , दि. ३० (पीसीबी) – कोरोना नियमांचे उल्लंघन करुन पिंपळे गुरवमध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेणं नगरसेवकाला चांगल महागात पडलं आहे. कोरोना संसर्गात पाच पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी जमाता येत नाही, त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक सागर आंघोळकर आणि प्रतिभा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शोभाताई नवनाथ जांभूळकर यांच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गूरवमधील पूजा हॉस्पिटलसमोर सोमवारी (दि. २७) घडली.

 

सांगवी पोलिसात या प्रकरणी पोलिस हवालदार तुषार दशरथ साळुंखे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी आयोजकांवर 564/2021 भादवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 चे कलम 51ब, भा.द.वि. क261,270 आणि साथीचे रोग अधिनीयम 1897 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना संसर्गात ओमिक्रॉन वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आल्याने पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येत नाही, तरीही पिंपळे गुरव येथे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन भाजप नगरसेवक सागर आंघोळकर व शोभाताई नवनाथ जांभूळकर यांनी केले होते.यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेतली गेलेली नाही. कोरोना नियमांचे घालून दिलेले मनाई आदेश व नियमाचा भंग झाला आहे. त्यामुळे आयोजकांवर गर्दी जमवून आदेशाचा भंग केल्याने गुन्हे दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हवालदार जी.व्ही. राऊत करत आहेत.