नोरा फतेहीला कोरोनाची लागण …

0
210

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून रथीमहारथींची नावे आता पुढे येत आहेत. वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे, प्रजक्त तणपुरे अशा राजकीय मान्यवरांना कोरोनाने गाठले आहे. मागच्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना अलिकडच्या काळात कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. करिना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पाठोपाठ आता नोरा फतेहीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात नोरानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

 

नोरा फतेहीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिलं, ‘मी सध्या कोरोनाचा सामना करत आहे. खरं सांगू तर हे सर्व खूप कठीण आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा. हा विषाणू खूप वेगाने पसरताना दिसत आहे. माझं दुर्दैव आहे की मला करोनाची लागण झाली आहे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. सुरक्षित राहा.’