निगडीतील परिमंडल कार्यालयातील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश  

0
430

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेवून शिधापत्रिकाधारकांची पिळवणूक करत असल्याची तक्रार मानवाधिकार संघटनेने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे केली होती. याची दखल घेत या प्रकाराची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दिले आहेत.

निगडीतील ‘अ’ आणि ‘ज’ परिमंडल कार्यालयातील अधिकारी निवडणूक काम व ऑनलाईन कामाच्या नावाखाली मनमानी करून शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेवत आहेत. यामुळे शिधापत्रिकाधारकांची पिळवणूक होत आहे.

याबाबत मानवाधिकार संघटनेने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत या प्रकाराची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी परिमंडळ कार्यालयाला दिले आहेत.