नालासोपारा : भीषण आगीत २५ दुकाने जळून खाक

0
418

मुंबई, दि. २ (पीसीबी) – नालासोपाऱ्यात भीषण आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये जवळपास २० ते २५  दुकाने जळून खाक झाली आहेत. यातील बहुतांश दुकाने ही कपड्याची आणि इलेक्ट्रॉनिक्सची आहेत. नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमध्ये आज(दि.२) पहाटे ही भीषण आग लागल्याचे समजते. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमध्ये आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते, मात्र ही आग काही क्षणांमध्येच फोफावली. बाजूला असलेल्या निवासी इमारतींमध्येही  धुराचे लोट पसरले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.