हिंजवडीत कार अडवून दाम्पत्याला जबर मारहाण

0
656

हिंजवडी, दि. २ (पीसीबी) – कारने घरी निघालेल्या दाम्पत्याला एकाने दगडाने आणि हाताने जबर मारहाण करुन जखमी केले. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि.३१) रात्री आठच्या सुमारास डी.सी शोरुम, बॉटल रॉक हॉटेलचे समोर सुस रोड हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी सिध्देश्वर इंद्रमनी जेना (वय ४०, रा. फ्लॅट क्र. ए/८०३, माउट युनीक, सुस) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन खेडेकर (रा. वय २५, रा. सुतारवाडी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी सिध्देश्वर हे त्यांच्या कारने पत्नी आणि मुलांना घेऊन सुस येथील घरी चालले होते. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या चेतन याने सिध्देश्वर यांच्या कारवर दगड मारला. तसेच कार अडवून सिध्देश्वर आणि त्यांच्या पत्नीला दगडाने जबर मारहाण केली. आरोपी चेतन एवढ्यावरच थांबला नाही त्याने सिध्देश्वर यांना पोलिसांना फोन लावण्यास सांगून,  मी तुम्हाला मारहा करत आहे असे सांगा, असे म्हणाला सिध्देश्वरने पोलिसांना तसा फोन लावला मात्र पोलिस घटनास्थळी येताच चेतन पसार झाला. हिंजवडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.