नागरिकांच्या सोयी साठी कोणत्याही नेत्यांची वाट न पाहता, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून साई चौक येथील उड्डानपुल वाहतुकीस खुला

0
580

महापौर सौ.उषाताई(माई)ढोरे यांच्या हस्ते उड्डानपुलाचे उदघाटन करण्यात आले

पिंपरी,दि.९(पीसीबी) – आज सोमवार (दि.०९ मार्च) रोजी साई चौक येथील उड्डाणपुलाची दुसरी बाजू वाहतुकीस सज्ज असुन (औंध ते काळेवाडी मार्ग) चे उदघाटन महापौर सौ.उषाताई(माई)ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतत केलेल्या मागणी नुसार साई चौक येथील उड्डानपुल वाहतुकीस खुला करण्यात न आल्याने कोणत्याही नेत्यांची वाट न पाहता नागरिकांनसाठी आज महापौर सौ.उषाताई(माई)ढोरे यांच्या हस्ते उड्डानपुलाचे उदघाटन करण्यात आले

साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळण वळण असलेले परिसरातील चौक आहे परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसे दिवस वाढ होत चालली होती . नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते . यामुळे नगरसेवक श्री. शत्रुघ्न काटे व नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांच्या सतत पाठपुराव्याने नवनगर विकास प्राधिकरण यांच्या मार्फत साई चौक येथे उड्डाणपूल बांधण्याबाबत ठरविण्यात आले होते. तरी साई चौक येथील उड्डाणपुलाची एक बाजू (काळेवाडी ते औंध मार्ग) चे काम पुर्ण झाले असून नागरी वाहतुकीस सज्ज आहे तसेच उड्डाणपुलाची दुसरी बाजूचे (औंध ते काळेवाडी) काम पुर्ण झाले असुन आज वाहतुकीस खुली करण्यात आली आहे.

या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये IT कंपनी हिंजवडी हब मध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवासियांना वाहतुकीचा प्रश्नबाबत मोठा दिलासा मिळणार आहे . या उड्डाणपुलामुळे वाकड , डांगे चौक , काळेवाडी,रावेत मध्ये जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर झाला असुन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे .यावेळी सत्तारूढ़ पक्ष नेता श्री. नामदेव ढाके,माजी स्थायी समिति अध्यक्षा सौ.ममताताई गायकवाड, नगरसेविका आरतीताई चोंधे, नगरसेवक , श्री.विनायक गायकवाड,श्री. संजय कुटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.