नवी सांगवीतील पुणे इंटरनॅशन प्री स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

0
544

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – नवी सांगवी येथील पुणे इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये परिसरातील महिलांना माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या पत्नी शुभांगी जगताप यांच्या हस्ते गुलाबाची फुले व भेट वस्तू देऊन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी रागिणी म्हसेकर, राणी महाजन, साधना कदम, कार्यक्रमाचे संयोजक ललित म्हसेकर यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.