सुखद वार्ता: मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरे करमुक्त

0
469

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरे करमुक्त करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. जे आश्वासन पूर्ण करण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता करातून सुट देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिवसेनेच्या या मागणीला मान्यता देत मंजुरी दिली आहे.

शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मुंबईतील ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती. तसेच याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. ज्यानुसार हा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.