पिंपळेसौदागरमधून महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू; नगरसेविका निर्मला कुटे यांच्या पाठपुराव्याला यश

0
978

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळेसौदागरमध्ये महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या तेजस्विनी बसला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही बससेवा सुरू करण्यासाठी नगरसेविका निर्मला कुटे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पीएमपी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

यावेळी चंदा भिसे, कुंदा भिसे, सुप्रिया पाटिल, गितांजली कडते, सुरेखा काटे, प्राजक्ता झिंजुर्डे, कांताबाई भिसे, कौसा झिंजुर्डे, जयश्री झिंजुर्डे, शीतल झिंजुर्डे, शिल्पा झिंजुर्डे, स्वाती झिंजुर्डे, वैशाली झिंजुर्डे, शारदा काटे, अश्विनी काटे, कविता भिसे, अनिता भिसे, विजयमाला सावंत, प्रीती सिंग, सुषमा जाचक, मंगल भिसे, शोभा काटे, रूपा मुरकुटे, प्रज्वला शेलार, कलाबाई कुटे, नुतन कुटे, मंदा कुटे, भारती कुटे, अंजना कुटे, बबीता कुटे, कल्पना कुटे, सुवर्णा कुटे, सुरेखा कुटे, मिरासे, इंदु सुर्यवंशी, मनीषा शिर्के, शीतल पटेल, दिपा पुजारी, योगिता नाशिककर, दिपा पवार, रेष्मा दळव आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या, “पिंपळेसौंदागरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. या भागातील ७० टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून यामध्ये महिला नोकरदार वर्गाचा मोठा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पीएमपीमार्फत फक्त महिलांसाठी पिंपळे सौदागर-रहाटणी येथुन कुणाल आयकॉन रोडमार्गे तेजस्विनी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी मी स्वतः आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली होती. तसा लेखी प्रस्ताव पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक विभागाकडे पाठवला होता. त्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते तेजस्विनी बसवरील प्रथम महिला कंडक्टर आदिती भागवत यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका निर्मला कुटे यांनी सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.