नवरा-बायकोचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मामावरच कोयत्याने वार

0
825

पुणे, दि. ७ (पीसीबी) – बायकोशी भांडू नकोस कामावर जात जा असे समजून सांगणार्‍या मामावरच भाच्याने कोयत्याने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील जनता वसाहतमधील गल्ली क्रमांक ७१ मध्ये घडली.

देवीदास तुकाराम बेलुसे असे जखमी मामाचे नाव आहे. तर आरोपी भाचा मयूर दिलीप डिंबळे याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता वसाहत मधील गल्ली क्रमांक ७१ मध्ये आरोपी मयूर डिंबळे हा त्याच्या कुटुंबासह राहतो. तो मागील तीन चार महिन्यांपासून कामाला जात नव्हता. तसेच दारू पिऊन घरात भांडण करायचा. यामुळे घरच्यांनी मामा देवीदास बेलुसे यांना फोन करून सांगितले की मयूर ची समजूत काढा. त्यानंतर मामा देवीदास हे मयूरच्या घरी येऊन समजूत काढू लागले की आरे बायकोशी भांडण करू नकोस कामावर जात जा. त्यावर मयूर चिडून मामाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यानंतर स्थानिकांनी देवीदास मामाला जवळील रुग्णालयात दाखल केले. तर आरोपी मयूरला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास गेवारे तपास करत आहेत.