ट्रक-स्विफ्टच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

0
782

रावेत, दि. ७ (पीसीबी) – स्विफ्ट कार (एमएच १२ इएम १९७५) एका ट्रकवर (जीजे ३१ टी २६१४) आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू धाला ्सल्याची माहिती पुझे येत आहे. ही घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर रावेत येथील सेन्टोसा हॉटेल शेजारी आज रविवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

यामध्ये अभिषेक रवींद्र शर्मा, रा. काशीपुर, उत्तराखंड, पराग प्रवीण हरेगावकर, प्रथम हौसिंग सोसायटी, लोकमान्य कॉलनी, कोथरूड, सुरज राजेंद्र मांजरे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. रावेत पोलीस चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविले आणि वाहतूक सुरळीत केली.

रावेत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर रावेत येथील सेन्टोसा हॉटेल शेजारी रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार जोरात धडकली. या कारमध्ये एकूण चार व्यक्ती होते. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी सहाच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू होती. चारपैकी कोणत्या तिघांचा मृत्यू झाला आहे. यांची अद्याप ओळख पटली नाही.