देहूगावात आपला खून करेन या भितीने नऊ जणांनी मिळून केला सराईताचा खून

0
776

देहूगाव, दि. ७ (पीसीबी) – खूनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगार आपला खून करेन या भितीने नऊ जणांच्या टोळक्यांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमरास कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. या खूना प्रकरणी काही तासांत देहूरोड आणि चाकण पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.

शंकर दत्तात्रय बाळसराफ असे मयत सराईताचे नाव आहे. त्याने आरोपींना कारागृहाबाहेर येताच ठार मारणार अशी धमकी दिली होती. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. आणि सोबत चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आरोपीना होती. याच भीतीने ९ जणांच्या टोळक्याने त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मंगेश शाम केदारी (वय २१), अवधूत साईनाथ लांगे (वय २४), अमित मारुती टिळेकर (वय २५), शुभम दिलीप परंडवाल (वय २२), प्रतीक तुकाराम बजबळे (वय १९, सर्व रा. देहूगाव माळवाडी ता. हवेली जि. पुणे) या पाच जणांना अटक केली आहे. तर इतर चार आरोपी सध्या फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शंकर बाळसराफ हा आरोपी वरील आरोपींना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यांपैकी आरोपींचा मित्र टिळेकर याला पोटात चाकू भोसकून शंकरने गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी त्याला जेल ही झाली होती. मात्र, मी बाहेर आल्यानंतर तुमच्या पैकी एकाला तरी ठार करेन, अशी धमकी दिली होती. तो नुकताच जेल मधून सुटला होता. शंकर आरोपींच्या शोधात होता. एवढेच नाही तर तो सोबत चाकू घेऊन फिरत असे. शुक्रवारी देहूगावमध्ये मयत शंकरला गाठले आणि दुचाकीवरून आलेल्या नऊ जणांपैकी काहींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी होऊन शंकरचा मृत्यू झाला. शंकर आपल्याला जीवे ठार करेल या भीतीच्या पोटी आरोपीनी त्याला ठार केल्याची कबुली पोलिसात दिली आहे. अद्याप चार आरोपी फरार असून त्यांचा देहूरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.