नवमतदार असलेल्या तरूणाईमध्ये मतदानाचा उत्साह

0
488

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी मतदारसंघातील विधानसभेच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सर्व ठिकाणी नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सेलिब्रिटींनी ही मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला. त्याचबरोबर नवमतदार असलेली तरूणाई ही मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आली.