विधानसभा निवडणूक २०१९ :  अतुल कुलकर्णी, शोभा खोटे, सुनिल बर्वे या  कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
578

मुंबई, दि. २१ (पीसीबी)-  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांचा उत्साह दिसत आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सकाळीच आपला हक्क बजावला.

अभिनेता अतुल कुलकर्णी याने गोरेगावमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी अंधेरीमध्ये मतदान केले. अतुल कुलकर्णीप्रमाणेच अभिनेता सुनील बर्वेनेही गोरेगावमध्येच मतदान करुन हक्क बजावला.

त्याचप्रमाणे अभिनेत्री  पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेता अतुल परचुरे, अभिनेता प्रशांत दामले यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

                                        अभिनेत्री  पद्मिनी कोल्हापुरे

                                                   अभिनेता अतुल परचुरे

                                                अभिनेता प्रशांत दामले