नरेंद्र मोदींविरोधात लढणार जवान तेजबहादुर यादव; समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी

0
507

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत असलेल्या वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पार्टीने आपला उमेदवार बदलला असून बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे. जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत आवाज उठवल्यानंतर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. सुरुवातीला यादव यांनी मोदींविरोधात अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

समाजवादी पक्षाने यापूर्वी वाराणसी मतदारसंघातून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, काही वेगळ्या राजकीय गणितांचा विचार झाल्यानंतर समाजवादी पक्षाकडून शालिनी यादव यांची उमेदवारी रद्द करुन त्याऐवजी बीएसएफ जवान तेजबहादुर यादव यांना उमेदवारी  जाहीर केली आहे.

बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांनी यापूर्वीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काही कारणाने त्यांचा अर्ज बाद झाला होता. त्यानंतर उमेदवारीसाठी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. दरम्यान, जवान यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता जवान यादव यांचा अर्ज पात्र ठरल्यानंतर २ मे रोजी शेवटच्या दिवसापूर्वी शालिनी यादव आपला अर्ज मागे घेतील, असे सपाकडून सांगण्यात आले आहे.