सौरभ गोखले, भूषण प्रधान, राहुल बजाज यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
653

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मावळ आणि शिरूर मतदारसंघात  आज सोमवारी (दि. २९)  मतदान होत आहे. मराठी अभिनेते सौरभ गोखले, भूषण प्रधान यांनी चिंचवड येथे मतदानाचा हक्क बजावला. तर आकुर्डी, काळभोरनगर येथे उद्योगपती राहुल बजाज यांनी मतदान केले.  

मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दुपार तीन वाजेपर्यंत मावळमध्ये ४२ टक्के, तर शिरूर मध्ये ४० टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, मराठी अभिनेते आणि सेलेब्रिटी यांनी मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. अनेक अभिनेते, उद्योगपती यांनी मतदान केले आहे.आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून अभिनेते आणि उद्योगपती यांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.