नरेंद्र मोदींनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक

0
579

नवी दिल्ली,दि.१८ (पीसीबी) : एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करण्याची शक्यता आहे. अशातच राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कौतुक केलं आहे. निषेध नोंदवण्यासाठी वेलमध्ये कधीच न उतरल्याबद्दल मोदींनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दल या पक्षांची पाठ थोपटली

सदनात संवाद असणं आवश्यक आहे. घमासान वादावादी झाली तरी चालेल, मात्र अडथळे आणण्याऐवजी संवादाचं माध्यम वापरलं गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल यांनी वेलमध्ये न उतरण्याचा निश्चय केला आहे. या पक्षांनी संसदीय निकषांचे काटेकोरपणे पालन केले आहे. ते कधीही ‘वेल’मध्ये गेले नाहीत. तरीही त्यांनी आपले मुद्दे अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. मात्र त्यामुळे ना राष्ट्रवादीच्या राजकीय प्रवासाला लगाम बसला, ना बीजेडीचा मार्ग खुंटला. त्यांचं कोणतंही राजकीय नुकसान झालेलं नाही. माझ्या पक्षासह इतरांनीही त्यांच्याकडून शिकायला हवं. यावर चर्चाही व्हायला हवी आणि त्यांचे आभारही व्यक्त करायला पाहिजेत.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.