शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा – कुमारस्वामी

0
717

बेंगळुरु,दि.१८(पीसीबी) – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसला भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला आहे. “हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, त्या तुलनेत भाजपाचं हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळं काँग्रेसनं विचार करावा,” असं मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याच्या दिशेने काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रयत्न सुरु आहेत. असे असताना कुमारस्वामी यांनी काँग्रेसला जरा हटके सल्ला दिला आहे. काँग्रेसने तुलनेने मवाळ असणाऱ्या भाजपला पाठिंबा द्यावा, असं ते म्हणाले आहेत.

जहाल हिंदुत्वाशी जुळवून घेताना काँग्रेस अस्थीर होते. तीन पक्षांसोबत सरकार स्थापन करण्यापेक्षा काँग्रेस भाजपसोबत जाण्याचा विचार करेल का नाही, मला माहित नाही, असंही ते म्हणाले आहे.