शरद पवार समजून घ्यायला त्यांना १०० जन्म लागतील – संजय राऊत

0
760

मुंबई,दि.१९(पीसीबी) – मोदी-शहा समजून घेण्यासाठी तुम्हाला २६ जन्म लागलीत, असं भाजपच्या एका नेत्याने मला म्हटलं होतं. आता मी यांना म्हणतो की शरद पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला १०० जन्म लागतील, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे सत्तास्थापेनाचा संभ्रम वाढला आहे. यावरच बोलताना संजय राऊतांनी भाजपला लक्ष करत पवारांना समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील, असं म्हटलं आहे.

आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार काही बोलत असतील तर विश्वास ठेवावा. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही. आम्ही निश्चिंत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.