नको त्या पक्षात वेळ घालवला, आता शिवसैनिक म्हणून मरणार – खासदार धैर्यशील माने

0
858

मुंबई, दि. १ (पीसीबी) – जन्माला माणूस म्हणून आलो, आता शिवसैनिक म्हणून मरणार,  असा निर्धार कोल्हापुरातील हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी वरळी येथे व्यक्त केला. शिवसेनेचा वरळी विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांचा मेळाव्यात  ते बोलत होते.  

यावेळी माने म्हणाले की, शिवसेनेसारखा कार्यशील, जिवंत आणि ज्वलंत पक्ष नाही, शिवाय मी नको त्या पक्षात वेळ घालवला, जन्माला माणूस म्हणून आलो, आता शिवसैनिक म्हणून मरणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान धैर्यशील माने हे लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले होते.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा पराभव करत शिवसेनेचा भगवा फडकवला होता.