पक्षातून कितीहीजण गेले तरी आम्ही पवार साहेबांसोबतच – अजित पवार

0
693

पुणे, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, नेते भाजप आणि सेनेत जात आहेत. तिथे गेल्यावर ते पवार साहेबांबद्दल आदर व्यक्त करतात. पण  पक्षातून कितीहीजण गेले तरी आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी पवार साहेबांसोबतच आहोत. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष पुन्हा उभा करू, असे राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी  म्हटले आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार  म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मात्र पक्षातून कितीहीजण गेले तरी आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी साहेबांसोबत आहोत. तसेच, यापुढील काळात निवडणुकीला सामोरे जाताना सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, पुन्हा राष्ट्रवादी पक्ष ताकदीने उभा करू,  असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पवार पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून भाजप, सेनेत प्रवेश करणार्‍यांना अनेक शब्द देऊन घेतले जात आहे. पण सध्याचे विद्यमान आणि त्यांच्याकडील इच्छुक असणार्‍या उमेदवारांची संख्या सत्ताधारी पक्षाकडे अधिक आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते सैरभैर झाल्याशिवाय राहणार नाहीत.  तेव्हा राज्यात चित्र निश्चित वेगळे दिसेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.