धक्कादायक : ३४ मानवी सांगडे आणि १६ कवट्यांसह एकाला अटक

0
1683

छपरा, दि. २८ (पीसीबी) – बिहारमधील छपरा रेल्वे स्थानकावरुन एक प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल ३४ मानवी सांगडे आणि १६ कवट्या जप्त करण्यात आल्या आहेत.

संजय प्रसाद असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो बलिया-सियालदह एक्सप्रेसने प्रवास करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया येथून संजयने सांगाडे विकत घेतले होते, आणि भूतानमार्गे ते चिनला पोहोचवायचे होते असे पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुल केले आहे. पण नेमके कशासाठी या सांगाड्यांचा वापर केला जाणार होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संजयकडून नेपाळ आणि भूतानमधील चलन, अनेक एटीएम कार्ड, दोन ओळखपत्र, नेपाळचे सिम कार्डदेखील जप्त केले आहेत, अशी माहिती पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तनवीर अहमद यांनी दिली आहे. त्याला आज (बुधवार) न्यायालयात हजर केले जाणार असून सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचेही अहमद यांनी सांगितले.