मनूवाद संपविण्यासाठी फुले दाम्पत्यांचे विचार पुढे आणा – शरद पवार

0
533

पुणे, दि. २८ (पीसीबी) – समाज सुधारक महात्मा फुले यांनी समाजाला आधुनिकतेचा विचार दिला. मात्र, सध्या प्रतिगामी विचार पुढे आणले जात आहेत. मनुवादाचा विचार अद्यापही जिवंत आहे. त्यामुळे मनूवाद संपवायचा असेल, तर फुले दाम्पत्यांचे विचार पुढे न्यावे लागतील’, असे प्रतिपादन   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) येथे केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान  केला.  याप्रसंगी पवार बोलत होते.

महात्मा फुले यांनी उभ्या आयुष्यात समाजाला सन्मान देण्यासाठी विचार केला. विचाराने काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. समाजाला समता आणि विकासाच्या मार्गावर आणले. फुलेंनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. विरोध असताना सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. शेतकरी पुढे गेल्याशिवाय समाज पुढे जात नाही, हे त्यांनी सांगितले. देशी वाण, दूध उत्पादन यांचा विचार दिला. फुलेंच्या कृषीविचारांवर  आम्ही कधीच विचार केला नाही. केवळ शेती करून चालणार नाही, असे शरद पवार म्हणाले.