धक्कादायक: सुनेसोबत लग्न करण्यासाठी बापाने केला मुलाचा खून

0
562

फरिदकोट, दि. १४ (पीसीबी) – पंजाबमधील फरिदकोट येथील डाबरी खाना गावात एका ६२ वर्षांच्या वृद्ध बापाने सुनेसोबतच्या अनैतिक संबंधातून स्वत:च्या मुलाचाच धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

छोटा सिंह (वय ६२) असे मुलाचा खून करणाऱ्या वृध्द बापाचे नाव आहे. फरिदकोट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छोटा सिंहचा मोठा मुलगा ४० वर्षांचा होता. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला एक मुलगा देखील आहे. छोटा सिंहचे मोठ्या सुनेशी प्रेमसंबंध होते. छोटा सिंहने दोन महिन्यांपूर्वी सुनेसाठी फरिदकोट शहर येथे भाड्याने घरही घेतले होते. सुनेशी लग्न करुन या घरात राहायला जाण्याचा निर्णय देखील त्याने घेतला होता. सासरा व सुनेमधील संबंधाची माहिती कुटुंबीयांनी दिली होती. छोटू सिंहच्या पत्नीला याची कुणकुण होती. मात्र, छोटा सिंह कोणाचेही ऐकत नव्हता.

मंगळवारी रात्री छोटा सिंहचा मोठा मुलगा घरात झोपला होता. यादरम्यान छोटा सिंहने तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले. हत्येनंतर त्याने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे एका मोठ्या पिशवीत भरले. छोटा सिंह ही पिशवी घराबाहेर फेकायला जात असताना लहान मुलाने त्याला पाहिले. पिशवीवर रक्ताचे डाग असल्याने त्याने वडिलांकडे विचारणा केली. यादरम्यान, छोटा सिंहने मोठ्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करत छोटा सिंहला अटक केली आहे.