धक्कादायक: मोठ्या बहिणीने केला पाच वर्षाच्या लहान भावाचा खून

0
1096

लुधियाना, दि. १० (पीसीबी) – स्पेस मिळत नव्हती म्हणून मोठ्या बहिणीने स्वत:च्या पाच वर्षाच्या लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.६) लुधियाणा येथील अमरजित कॉलनीतील राहत्या घरात घडली.

अंश कनोजिया (वय ५) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंशची मोठी बहीण रेणू (वय १९) हिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आई-वडील बाहेर गेल्यानंतर रेणूने अंशचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह एका बॅगेत टाकला. आईवडील घरी परतल्यावर तिने अंश बेपत्ता झाल्याचा कांगावा केला. रविवारी पहाटे चार वाजता ती उठली आणि तिने अंशचा मृतदेह ज्या बॅगेत होता ती बॅग घराजवळील निर्जनस्थळी फेकली. हत्येनंतर काही तास अंशचा मृतदेह रेणूच्याच खोलीत होता. गुन्ह्याची कबुली देताना रेणूने सांगितले कि, “भावामुळे मला माझी ‘स्पेस’ मिळत नव्हती. भाऊ सारखा आईवडिलांकडे माझ्याविरोधात तक्रार करायचा. या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात त्याची हत्या केली”.