धक्कादायक: महिला डॉक्टरची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या

0
534

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – एका महिला डॉक्टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतल्या नायर रुग्णालयात घडली.

पायल सलमान तडवी (वय २३, रा मुंबई मुळ रा. जळगाव) असे या डॉक्टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत डॉक्टर पायल तडवी यांचा मृतदेह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत तिच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. तिच्या आईने रॅगिंगबाबत १० मे रोजी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यात डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती अहिरे आणि डॉ अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ डॉक्टरनी पायलचा छळ करत असल्याचे म्हटले. रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पायलच्या आईने केला असून रुग्णालय प्रशासनाने वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टळली असती, असेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.आत्महत्येविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांत तीन सहडॉक्टर तरुणींविरोधात तक्रार करण्यात आली आहे. आग्रीपाडा पोलीस तपास करत आहेत.