देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही

0
490
मुंबई, दि.१६ (पीसीबी) – देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही,’ अशी जळजळीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.
ते म्हणाले की, ‘तुमचे सरकार असतानाही उपमुख्यमंत्री, त्यांचे सरकार असतानाही उपमुख्यमंत्री…सिंचन घोटाळा केला तरी काही नाही, शेतकऱ्यांना वाईट बोलले तरी काही नाही. कधी चिडून राजीनामा देतात. पण इतके सगळे केल्यानंतरही ते मध्यवर्ती आहेत,’ ‘मुख्यमंत्र्यांचा काही अभ्यास, अजेंडा नाही. मला मुख्यमंत्र्यांनी रजिस्ट्रर सावकारी आणि सावकारी यामधील फरक सांगावा. हे जेव्हा तुम्हाला माहिती नसते तेव्हा डोक्यात सावकारी संपवायची आहे याबद्दल अजेंडाच निर्माण होऊ शकत नाही, असे पाटील म्हणाले.
‘शरद पवारांवर पीएचडी करण्याचे काम चालू असताना आता अजित पवारांचे व्यक्तिमत्व कमाल असून आपल्याला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचे, यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले.