“मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल”

0
469

मुंबई,दि.१६(पीसीबी) – मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायजर वापरण्याचे आवाहन सरकारने सर्वसामान्य लोकांना केलं आहे. पण हे मास्क, सॅनिटायजरर्स बाजारात अव्वाच्या सव्वा किंमतीत विकले जात आहेत. जे सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळंच छगन भुजबळ यांनी सर्व विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली आहे. औषध विक्रेते मास्क, सॅनिटायजर मोठ्या किंमतीत विकतात आणि त्यामुळं ते खरेदी करणं सर्वसामान्य, गरीब जनतेला परवडत नाही. यामुळंच भुजबळ यांनी मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार करणाऱ्या विक्रेत्यांना इशारा दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. तर ७५ कोरोना संशयित सापडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं सर्वाना काळजी घेण्याचं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केलं आहे.