दीपाली सय्यद कडाडल्या, नवनीत राणा यांचा उल्लेख `अमरावतीची भाकरवडी`

0
351

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची तोफ आणखी एकदा कडाडली आहे. दीपाली सय्यद यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

मुंबई पोलिसांनी तुरूंगात दिलेल्या अमानुष वागणुकीविरोधात नवनीत राणा यांनी संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी लावली. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना नवनीत राणांनी मुंबई पोलिसांना थेट इशारा दिला होता. यावरून दीपाली सय्यद यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.

नवनीत राणांचा अमरावतीची भाकरवडी असा उल्लेख करत दीपाली सय्यद यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तु तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

दरम्यान, पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास जरी. आम्ही तक्रार करून उभं करू तुला गृहमंत्र्यांच्या दारी, असा इशारा देखी दीपाली सय्यद यांनी दिला आहे.