भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

0
334

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) : ‘रिकामा हंडा, पाण्याविना सखे कोरडा’सारखे विविध बॅनर, भगवा आणि कमळाचा गमछा गळ्यात घालून हजारो नागरिकांनी जल आक्रोश मोर्चात सहभाग नोंदविला. ‘पाणी द्या…पाणी द्या’… किंबहुना, किंबहुना काय म्हणता… अशा विविध घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पैठण गेट ते महापालिकेदरम्यान मोर्चात देण्यात आल्या. दरम्यान, भाजपाच्या या मार्चाला कधी नव्हे तो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. आगामी महापालिका निवडणुकिच्या दृष्टीने शिवसेनेच्या विरोधात भाजपाने या निमित्ताने आपली ताकद दाखवून दिली आहे.

आठवडाभरापासून भाजपने मोर्चाची जोरदार तयारी केली होती. त्यानुसार मोर्चात प्रत्येक वार्डातील महिला सायंकाळी चार वाजेपासून रिकामे हंडे सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी साडेपाचदरम्यान मोर्चास पैठण गेट येथून सुरवात झाली. उघड्या जीपमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, संजय केणेकर, विजया राहटकर सहभागी होते. टाळ मृदंगाच्या गजरात एक मंडळ, जागरण गोंधळ करणारा ग्रूप सर्वांचे आकर्षण ठरले.

पैठण गेट येथे सुहास दाशरथी यांनी तर डाव्या बाजूने भाजपतर्फे स्टेज उभारण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी तर काही ठिकाणी कटआऊट लावण्यात आले होते. मोर्चात राजू शिंदे, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, महेश माळवतकर, नितीन चित्ते, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, अमृता पालोदकर,अनुराधा चव्हाण, सविता कुलकर्णी, प्रशांत देसरडा, दिलीप थोरात, संजय जोशी, जगदिश सिध्द, जालिंदर शेंडगे, राजेंद्र साबळे पाटील, सिध्दार्थ साळवे, सागर पाले, अरुण पालवे, लक्ष्मीकांत थेटे, कचरु घोडके, अनिल मकरिये, प्रवीण घुगे, बसवराज मंगरुळे, मयूर वंजारी यांनी सहभाग घेतला. मोर्चात २५ ते ३० हजार नागरिकांनी सहभाग घेतल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी केला.