दिवाळी तोंडावर रेशनची ‘कीट कीट ‘ राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन

236

चिंचवड येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून निषेध
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – वाढती महागाई लक्षात घेऊन जनसामान्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी दिवाळी फराळाचे साहित्य रास्त भाव दुकानातून आनंदी कीट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.साखर,रवा,चणाडाळ आणि पामतेल असा शिधा या योजनेतून फक्त शंभर रुपयात उपलब्ध करून दिला जाणार आहे.त्यामुळे या उपक्रमाला आनंदाचा शिधा असे नाव देण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करून राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली. मात्र दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली तरी आनंदाचा शिधा सर्व सामान्यांच्या घरात पोहचू शकला नाही. त्यामूळे जनसामान्यांचा शिधा मिळणार कधी आणि त्यांचा फराळ होणार कधी असा प्रश्न पडला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे , महीला अध्यक्ष प्रा .कविता आल्हाट, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, नगरसेवक सतीश दरेकर , शमीम पठाण , माया बारणे , कार्याध्यक्ष कविता खराडे, ज्योती तापकीर, संगीता कोकणे, ज्योती गोफणे ,मिरा कदम, संगीता ताम्हाणे , सारिका पवार , सुप्रिया सोलकुरे ,ज्योती निंबाळकर, निलेश डोके, दत्ता जगताप , किरण देशमुख, लाल मोहम्मद चौधरी, विष्णू शेळके, राजेंद्र साळुंखे, माधव पाटील, अकबर रशीद मुल्ला,हरीभाऊ तिकोणे, सावंत, सचिन निंबाळकर आदी उपस्थित होते.

शहर अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले महारष्ट्र हा महागाई ने त्रस्त झाला आहे अनेक समस्या या राज्या समोर असताना गरीब जनतेला शंभर रुपयाची आनंदी किट देण्याचा निर्णय घेतला.प्रत्यक्षात फक्त किटचा गाजावाजा केला पण गरिबांपर्यंत किट पोहचले नाही या अयशस्वी सरकारचा निषेध करतो. शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या राज्य सरकारने गोरगरीब जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली आणि चित्रात दिवाळी साजरी करायला सांगितली. गोरगरिबांची दिवाळी चित्रात आणि दिवाळी फराळ सरकारच्या पात्रात असा आरोप त्यांनी केला. विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे म्हणाल्या ऐन दिवाळीच्या काळात गरिबांच्या घरात अंधार पडला पण या सरकारला काही फरक पडेना आदरणीय विरोधी पक्षनेतेअजित दादांनी राज्यात दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितले परंतु सरकार आपल्याच तंद्रीत आहे जन सामान्यांचे त्यांना काही घेणे देणे नाही असा आरोप राज्यसरकार वर केला.