एकनाथ शिंदे ही तात्पुरती व्यवस्था, शिंदे गटातील नेत्याचे वक्तव्याने खळबळ

0
270

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, असं वक्तव्य शिंदे गटाच्याच नेत्याने केले असल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेनेच्या या खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. पण, मुख्यमंत्री हे नाराज असल्याचे बोलले जात आहे, याच मुद्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’ असा खुलासा शिवसेनेनं केला आहे.

मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल.”

एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, ‘शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.” असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.