दापोडीत बेकायदेशीर दारूसाठा जप्त

0
6

दि.०३(पीसीबी)-दापोडी परिसरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला १६ हजार १९५ रुपयांचा दारूसाठा अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१ मे) रात्री सव्‍वाआठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

याप्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार निखील वर्षे यांनी दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण काशीनाथ सूर्यवंशी (३२, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, दापोडी) या सफाई कामगारावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतील घर क्र. १४५ च्या शेजारी असलेल्या एका बंद शटरसमोरील मोकळ्या जागेत आरोपीने विनापरवाना दारू विक्रीसाठी ठेवली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी १६ हजार १९५ रुपये किमतीची दारू जप्त केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.