भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य समोर

0
2

दि.०३(पीसीबी)-पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे आम्ही या प्रकरणी कठोर पावलं उचललेली असून या प्रकरणातील दोषी व्यक्तीला सोडणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. दरम्यान, एकीकडे या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असताना याच प्रकरणातील आरोपीच्या किळसवाण्या प्रवृत्तीची धक्कादायक माहितीस समोर आली आहे. त्याला गावातून 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं, त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी अगोदरपासूनच विकृत प्रवृत्तीचा होता. गावकऱ्यांनी त्याच्या कथित विकृतींचा पाढाच वाचला आहे. आरोपीने गावातील शेळ्या, कोंबड्यांवरतीही अत्याचार केलेला आहे, असे तेथील लोकांनी सागितले आहे. अशा या विकृताला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याच्या गावकऱ्यांकडून केली जात आहे. या आरोपीने त्याच्या स्वतःच्या मुलीवरसुद्धा अत्याचार केले होते, अशीही खळबळजनक माहिती समोर येत आहे. याच क्रूर आरोपीने गावातील 65 वय असणाऱ्या महिलेवरही बलात्कार केला होता. गावातील शेतात जाणाऱ्या अनेक महिलांवर त्याची वाईट नजर असायची. अनेक वेळा त्याने या महिलांसोबत गैरकृत्य केले आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ही प्रकरणं समोर आली नाहीत, असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.दरम्यान, सध्या याच नराधमाच्या नसरापूरच्या कृतीने गावात दहशत पसरली असून गावातील महिला, मुली घाबरलेल्या आहेत. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.